नेहमी विचारले जाणारे प्रश्न
तक्रार निवारण मंचाचा हेतू आणि उद्दिष्ट काय आहे ?
हेतू:- नागरिकांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सुविधा प्रदान करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधेमुळे त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर, तक्रारीच्या सद्यस्थितीचा पाठपुरावा करता येतो आणि निवारणामुळे समाधान झाले किंवा नाही याबाबतचा अभिप्रायही देण्याची सुविधा प्राप्त होते. ही यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालयाला सर्व तक्रारींचा काळजीपूर्वक पाठपुरावा करू देते आणि प्रत्येक प्रकरणात योग्य कारवाई करण्यात आल्याची खातरजमा करते.

उद्दिष्ट:- प्रशासनाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने, सोईस्कर आणि प्रभावी निवारण करणे, हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.

मी कोणत्या प्रकारच्या तक्रारी दाखल करू शकतो ?
राज्यातील शासकीय कार्यालयांच्या संबंधित कामकाजाच्या अनुषंगाने कोणतीही तक्रारी दाखल केली जाऊ शकते.
कोणत्या प्रकारच्या तक्रारींचे निवारण पोर्टलद्वारे केले जाणार नाही ?
(अ) न्यायप्रविष्ट प्रकरणे किंवा निकालाधीन असणारी कोणतीही,

(ब) विभाग, जिल्हा किंवा उप-विभागीय स्तरावरील योग्य प्राधिकरणासमोर उपस्थित न केलेले वैयक्तिक आणि
(क) माहितीचा अधिकार संबंधित प्रकरणे.

राज्य सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरच्या संस्था (उदा. रेल्वे, बँका, रिझर्व्ह बँक इ.) यांचे विरुध्द तक्रार दाखल करता येईल का ?
नाही. राज्य सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरच्या संस्थाबाबतची तक्रार या पोर्टलवर दाखल करता येणार नाही.
आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल मी मराठी भाषेत पाहू इच्छित असल्यास, काय करावे ?
पोर्टल दोन्ही मराठी व इंग्रजी भाषा स्वरूपात पाहिली जाऊ शकते. पोर्टलवर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ड्रॉपडाउनमधून योग्य भाषा निवडता येते.
मी तक्रार कोणत्या भाषेमध्ये दाखल करू शकतो ?
आपण आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजी यापैकी कुठल्याही एका भाषेमध्ये सादर करू शकता.
मला या प्रणालीत प्रवेश करण्यासाठी (login) काय तपशील आवश्यक आहे ?
आपण आपला वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर प्रणालीमध्ये भरणे आवश्यक आहे. एका वेळेसाठीचा पासवर्ड (OTP), जो मोबाइल क्रमांक आणि इमेल ID वर पाठवला जाईल, तो प्रविष्ट करणे आवश्यक आहे. (तक्रार ही वैध ओळख असणाऱ्या नागरीकाकडूनच दाखल केली जात आहे, याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया आहे)
माझ्या मोबाईल / ई-मेल आयडी वर OTP प्राप्त न झाल्यास काय करावे ?
विनंती दाखल केल्यानंतर 120 सेकंदात जर OTP मिळाला नाही तर " OTP पुन्हा पाठवा" हे बटण पडद्यावर सक्षम केले जाईल. सदर बटन दाबून एक नवीन OTP मागविता येईल.
तक्रार दाखल करताना, मी माझे नाव कुठे लिहावे ?
प्रणाली मध्ये लॉग इन केल्यानंतर, OTP च्या वेळी प्रविष्ट केलेल्या इमेल आयडीच्या आधारे, वापरकर्ता नाव पूर्व प्रसिद्ध होते. (उदा. जर ABC@xyz.com हा इमेल आयडी असेल तर "एबीसी " हे पूर्व-प्रसिध्द नाव असेल). आवश्यक असेल तर हे नाव, तक्रार दाखल करतेवेळी सुधारित केले जाऊ शकते.
मला माझा जिल्हा आणि तालुका यांचा तपशील देणे सक्तीचे का आहे ?
तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार ही योग्य जिल्हा प्रशासनास वर्ग करणे /देणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा आणि तालुका यांचा तपशील अतिशय महत्वाचा आहे.
'तक्रारीचे स्वरूप' 'याचा अर्थ काय आहे ?
तक्रारीचे स्वरूप म्हणजे थोडक्यात आपल्या तक्रारिचा विषय. तो प्रत्येक प्रशासन प्रकार / विभागासाठी 'तक्रार स्वरूप' च्या ड्रॉपडाउन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
मी तक्रारी सोबत आधार दस्तऐवज (supporting documents) संलग्न (attach) करू शकतो का ?
होय. तक्रार सादर करताना आपल्या तक्रारी सोबत आपण आधार दस्तऐवज (प्रतिमा / पीडीएफ) अपलोड करू शकता. आधार दस्तऐवज अपलोड करण्यासाठी 'फाइल निवडा' बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
मी कॅप्चा प्रविष्ट करणे का आवश्यक आहे ?
तक्रार स्पॅमर किंवा मशीन द्वारे दाखल केली जात नसून वैध नागरीकाकडूनच दाखल केली जात आहे, याची खात्री करण्यासाठी कॅप्चा हे एक सुरक्षा साधन आहे.
कॅप्चा चुकीचा प्रविष्ट केला गेला तर काय होईल ?
आपणास एक नवीन प्रतिमा कोड दर्शविला जाईल जो आपण पुढे अचूकपणे प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
कॅप्चा प्रतिमा स्पष्ट नसल्यास मी काय करावे ?
अशा परिस्थितीत, कृपया आपण कॅप्चा पुढील "रिफ्रेश" बटन दाबावे. आपणास एक नवीन प्रतिमा दर्शवली जाईल.
मी आधार दस्तऐवज (supporting documents) अपलोड करणे विसरलो तर काय ?
आधार कागदपत्रे (supporting documents) संलग्न करून आपण नव्याने (पुन्हा) तक्रार अपलोड करू शकता. कृपया नवीन तक्रारीमध्ये मागील तक्रारिचा टोकन क्रमांकाचा उल्लेख करावा.
नागरिकाने तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार नागरिकाला तक्रारीबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी तक्रार निवारण मंचाची कार्यपद्धती काय आहे ?
(अ) तक्रार यशस्वीरित्या दाखल केल्यानंतर यंत्रणेद्वारे एक ई-पोचपावती जारी केली जाते.

(ब) संबंधित प्रशासनाला/विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई सुरू असल्याची अद्ययावत माहिती तक्रारदार नागरिकाला पोर्टलवर प्राप्त होते.

(क) तक्रारीचे निवारण झाल्यानंतर नागरिकाला तसे कळविले जाते आणि अभिप्राय नोंदविण्याची विनंती केली जाते.

माझी तक्रार किती दिवसात सोडवली जाईल ?
आपल्या तक्रारीचे 21 दिवसांत निराकरण होणे अपेक्षित आहे.
पोर्टलवर तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाकडून कशा प्रकारे कारवाई केली जाते ?
तक्रार दाखल करताना नागरिकाने निवडलेल्या पर्यायानुसार संबंधित प्रशासनाला /विभागाला तक्रार प्राप्त होते. तक्रार प्राप्त करणारा विभाग तक्रारीचे निवारण करतो.
माझ्या तक्रारीचे निवारण झाले आहे, हे मला कसे कळेल ?
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वर एक स्वयंचलित संदेश प्राप्त होईल. आपण पोर्टल लॉगिन करा आणि "ट्रॅक तक्रार स्थिती" या सदराखाली तपशीलवार प्रतिसाद पाहू शकता.
आधीच सादर केलेल्या माझ्या तक्रारी मी ट्रॅक (मागोवा) करू शकतो काय ?
आपण आपल्या प्रोफाइल मध्ये लॉग इन करा (तक्रार दाखल करण्यासाठी वापरलेले मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरून) आणि "ट्रॅक तक्रार स्थिती" टॅब अंतर्गत सादर केलेल्या सर्व तक्रारींची सद्य स्थिती बघू शकता.
माझ्या तक्रार निवारनेच्या गुणवत्तेबाबद अभिप्राय देण्यासाठी काही यंत्रणा आहे का ?
होय. आपण एकतर 'समाधानी' किंवा 'असमाधानी' म्हणून प्रत्येक तक्रारिचा अभिप्राय नोंदवू शकता. तुमचा अभिप्राय स्पष्ट करण्यासाठी टिप्पण्याही प्रदान करू शकता.
पोर्टल प्रतिसाद द्यायची थांबल्यास किंवा त्रुटी दाखवत असल्यास काय करावे ?
ब्राउझर रीफ्रेश करा. आपल्याला अजूनही समस्या असेल तर प्रणालीच्या बाहेर पडा (log out) आणि पुन्हा लॉग इन करा.
जर चूकीचा जिल्हा निवडून तक्रार दाखल केली गेली तर काय करावे ?
आपण योग्य जिल्हा निवडून पुन्हा एक नवीन तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. कृपया मागील तक्रारिच्या टोकन क्रमांकाचा उल्लेख करावा.
एकदा तक्रार दाखल केल्यानंतर मी दाखल केलेली तक्रार सुधारित/ बदल करू शकतो काय ?
एकदा दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आपणास सुधारणा/बदल करता येणार नाही. तथापि, मागील तक्रारीचा टोकन नंबर नमूद करून आपण नवीन तक्रार दाखल करू शकता.
यंत्रणेद्वारे प्रभावी काम सुनिश्चित करण्यासाठी कशा प्रकारची शासकीय / लेखा परिक्षण प्रणाली निश्चित केली आहे ?
मुख्यमंत्री कार्यालयातील चमू ठरावीक काळानंतर यादृच्छिक तत्वावर काही "समाधानी" आणि "असमाधानी" तक्रारकर्त्यांना कॉल करेल. प्राप्त अभिप्रायांद्वारे यंत्रणा सुधारण्यासाठी आणि आवश्यक सुधारणात्मक कारवाईसाठी प्रयत्न केले जातील.
टपाल सेवेमार्फत तक्रार दाखल करता येईल का ?
तक्रार निवारण मंच ही पूर्णपणेऑनलाईन यंत्रणा आहे आणि त्यामुळे येथे टपाल सेवेमार्फत तक्रार दाखल करता येणार नाही.
नोंदणी करताना जर माझ्या मोबाईलवर ओटीपी येत नसेल तर मी काय करावे ?
आपणास ओटीपी संदर्भांत काही तांत्रिक अडचण येत असल्यास कृपया खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा. आमचे कॉल सेंटर प्रतिनिधी आपल्याला मदत करतील. २४*७ नागरिक कॉल सेंटर: १८०० १२० ८०४० (टोल फ्री)
नोंदणी फॉर्ममध्ये मला कोणते तपशील भरायचे आहेत ?
* चिन्हांकित असलेल्या सर्व रकान्यात नागरिकाने आपले तपशील देणे आवश्यक आहे.
मी माझे वापरकर्तानाव (युझर आयडी ) विसरलो तर काय करू ?
आपण आपला मोबाइल नंबर / ईमेल आयडी वापरुन लॉग इन करू शकता.
मी माझा पासवर्ड विसरलो तर काय करावे ?
आपण "पासवर्ड विसरलात" पर्यायाचा वापर करुन आपला नवीन पासवर्ड तयार करू शकता.
मला माझ्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करायचे असल्यास काय करावे?
माझे प्रोफाइल' टॅबद्वारे आपण आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करू शकता.
२१ दिवसानंतर माझ्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर काय करावे?
स्मरणपत्र पाठवा' या टॅबमध्ये जाऊन आपण केलेल्या तक्रारीचे स्मरणपत्र आपण नोडल ऑफिसरला पाठवू शकता.
स्मरणपत्र पाठवूनही माझ्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर काय करावे ?
प्रथम स्मरणपत्र दिल्यावर १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच तक्रारसाठी २ रे स्मरणपत्र पाठवू शकता.
मी माझ्या तक्रारीवरील प्रदान केलेल्या उत्तरावर समाधानी नसल्यास काय करावे ?
आपण आपल्याला दिलेल्या उत्तरावर समाधानी नसल्यास आपण आपली तक्रार वरिष्ठ अधिकार्‍याकडे अग्रेषित करू शकता.
मला माझी तक्रार दाखल करताना काही मदत हवी असेल तर काय करावे ?
आपण कृपया खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा. आमचे कॉल सेंटर प्रतिनिधी आपल्याला मदत करतील. २४*७ नागरिक कॉल सेंटर: १८०० १२० ८०४० (टोल फ्री)
सिंगल साइन ऑन म्हणजे काय?
आपल्या सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर), सरकारी वेबसाइटचे लॉगिन आयडी वापरूनही आपणास तक्रार दाखल करता येते. फक्त तक्रार दाखल करण्यासाठी आपणास वेगळा लॉगिन आयडी तयार करण्याची आवश्यकता नाही.
माझ्या कोणत्याही सरकारी संकेतस्थळावरील लॉगिन आयडी वापरली जाऊ शकतात ?
हो.खालीपैकी कोणत्याही सरकारी संकेतस्थळावरील आपले लॉगिन आयडी असेल तर आपण त्याचा उपयोग तक्रार दाखल करण्यासाठीही करू शकता. महाडीबीटी , आपले सरकार सेवा हक्क, माझे सरकार (MyGov), महालाभार्थी पोर्टल
Aaple Sarkar - Chatbot