मा. मुख्यमंत्री यांचा संदेश

“आपले सरकार- तक्रार निवारण प्रणाली” वरआपले स्वागतआहे.मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इ. बाबी आता नागरिक शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होते.

तक्रारींना २१ दिवसात प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जातो. तक्रार निवारणासंदर्भातील माहितीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच कळविण्यात येते. तक्रार निवारणाबाबत तक्रारदारास "समाधानी" किंवा "असमाधानी" असल्याचा अभिप्रायही देता येतो.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी या पोर्टलची निश्चित मदत होईल, अशी मला अशा आहे.

नागरिकानीं या संकेतस्थळाचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा.

धन्यवाद...

मा. मुख्यमंत्री

Aaple Sarkar - Chatbot परत वर जा